RRB Group D Bharati 2026
RAILWAY RECRUITMENT BOARD GROUP D मध्ये 22000 जागासाठी भरती निघाली आहे. रेल्वे मध्ये काम करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. RRB Group D पदाच्या 22,000 जागा आहेत

RRB Group D मधील पदांचा तपशील
RAILWAY RECRUITMENT BOARD मध्ये घेण्यात येणाऱ्या सगळ्या जागा ह्या Group D category मधील आहेत. तर Group D म्हणजे कोणत्या जागा आहेत ते आपण पाहू
1) असिस्टंट
2) पॉइंटसमन
3) ट्रेकमन
4) ट्रॅक मेंटेनर
Group D मधील ही पदे आहेत जी भारतीय रेल्वे ची लाइफ लाईन आहेत, ह्या पदावरील व्यक्ति रेल्वे सुरुळीत चालू राहण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात.
RRB Group D 22,000 पदांसाठी आवश्यक पात्रता
या पदासाठी कोण अर्ज करू शकतो, या पदांसाठी आवश्यक असणारी पात्रता के आहे ते आपल्याला पहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास आणि आय टी आय झालेला असावा
वयाची अट : 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे असायला पाहिजे पण काही विशिष्ट वर्गासाठी वयाच्या अटी मध्ये सूट देण्यात आली आहे. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवाराना 33+5 वर्षे सूट देण्यात आली आहे. OBC प्रवर्गातील उमेदवाराना 33+3 वर्षाची सूट देण्यात आली आहे. या प्रवर्गातील उमेदवाराना अर्ज करण्यासाठी वयामध्ये सवलत मिळणार आहे.

RRB Group D पदासाठी अर्ज प्रक्रिया आणि शुल्क
अर्ज करत असताना अर्जा मधील माहिती लक्ष पूर्वक वाचून समजून घ्या, या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
ऑनलाइन शुल्क : जनरल, OBC आणि EWS category साठी शुल्क असणार आहे 500 रुपये आणि SC, ST महिला उमेदवार, माजी सैनिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी साठी फक्त 250 रुपये शुल्क असणार आहे.
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा
RRB Group D मध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात होत आहे 21 जानेवारी 2026 पासून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 फेब्रुवारी 2026
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://www.rrbapply.gov.in या वेब साईट वर जाऊन अर्ज करू शकता
तुम्हाला अश्याच नवीन नवीन नौकरी विषयक, योजनाविषयी माहिती साठी पुढील लिंक वर जाऊन भेट द्या www.angadgawale.in