PM KISAN YOJANA / प्रधान मंत्री शेतकरी सन्मान निधी योजना, शेतकर्‍यांना वार्षिक 6 हजार थेट खात्यावर जमा होत आहेत, 20 वा हप्ता तारीख जाहीर. (Latest Update) farmer best yojana

PM KISAN YOJANA ( प्रधान मंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ) भारतीय सरकार द्वारा लहान आणि मध्यम शेतकरी वर्गासाठी मदत म्हणून हि योजना सुरु करण्यात आली. ह्या योजनेचा मुख्य उद्देश शेतकरी लोकांना त्यांच्या शेतीच्या खर्चासाठी आणि घर खर्चासाठी एक छोटीसी मदत म्हणून या योजनेची सुरुवात झाली.

प्रधान मंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी झाली या योजनेचा लाभ देशातील छोटे शेतकरी आणि मध्यम शेतकरी घेऊ शकतात.

PM KISAN YOJANA कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय द्वारे राबवली जात आहे. या योजनेची देखरेख केंद्र सरकार च्या सोबत राज्य सरकार सुधा पाहत असते.

PM KISAN YOJANA चे मुख्य उद्देश :

  • सरकार कडून मदत : PM KISAN YOJANA च्या अंतर्गत शेतकर्‍यांना प्रत्येक वर्षी 6000 रू मदत मिळते. हि रक्कम वर्षातून 3 वेळा 2000 रू प्रति किश्त अशी ही रक्कम शेतकर्‍यांच्या डाइरेक्ट अकाऊंट वर जमा होत आहे.
  • छोटे आणि मध्यम वर्गीय शेतकरी ज्यांच्याजवळ शेती योग्य जमीन आहे अश्या लोकांसाठी हि योजना आहे.
  • PM KISAN YOJANA या योजनेला कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याण मंत्रालय द्वारे लागू करण्यात आले आहे.

प्रधान मंत्री शेतकरी सन्मान निधी योजना साठी लाभार्थी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. त्या लाभार्थ्याजवळ स्वतःची शेती उपयोगी जमीन असायला हवी. या योजने साठी मोठे शेतकरी, आयकर दाता , सरकारी कर्मचारी , प्रोफेशनल जसे कि डॉक्टर, इंजिनिअर या सारखे लोक अपात्र असतील.

PM KISAN YOJANA च्या 6000 रू चे वितरण खालील प्रमाणे होते

पहिली किस्त एप्रिल – जुलै
दुसरी किस्त ऑगस्ट – नोव्हेंबर
तिसरी किस्त डिसेंबर – मार्च
हेल्प लाईन नंबर 155261/ 1800 115 526

PM KISAN YOJANA वरून येणाऱ्या आणि आलेल्या किस्त विषयी जाणून घेण्यासाठी PM KISAN PORTAL वर जाऊन आधार नंबर किंवा खाते नंबर तिथे टाकून चेक करता येतो.
जर किस्त लांबली असेल तर त्या संबंधित अधिकार्याशी बोलण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी 155261/ 1800 115 526 या वरून तुम्ही कॉल करू शकता.

मोबाइल वरून PM KISAN YOJANA चे पैसे कसे चेक करावे

PM KISAN YOJANA / प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेची ऑफिसीएल वेबसाईट PM-KISAN (pmkisan.maharastr.gov.in) या वेबसाईट वर जाऊन

  • होमपेज वर “farmers corner” वर क्लिक करा
  • त्यानंतर दुसर्‍या पेज वर “Beneficiary Status” वर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे तुमचा आधार नंबर , बैंक अकाऊंट , आणि तुमचा मोबाइल टाकून सबमिट करावे लागणार आहे.

या योजने अंतर्गत शेतकर्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. PM KISAN YOJANA योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता वितरीत करण्यात आला.

PM KISAN YOJANA साठी Farmer ID का महत्वाची आहे ?

  • Farmer ID चा वापर कृषी योजनेमध्ये लाभार्थ्याची ओळख प्रमाणित करण्यासाठी केली जाते. यामुळे शेतकरी त्यांच्या लाभाचा प्राप्ती सुनिश्चित करतात.
  • Farmer ID मुळे शेतकर्‍यांची पात्रता तपासली जाऊ शकते. ज्यामुळे, योग्य शेतकर्‍यांना त्यांचा हक्क असलेला लाभ मिळतो.
  • Farmer ID च्या साह्याने शेतकर्‍यांना अर्ज प्रक्रिया आणि त्यासंबंधी कागदपत्रांची व्यवस्थापन सोपे होते.
  • Farmer ID चा वापर विविध शासकिय व वित्तीय योजनांमध्ये फायदा घेण्यासाठी होतो, ज्यामुळे शेतकर्‍यांना अधिक फायदे मिळतात.

PM KISAN YOJANA साठी Farmer ID कुठे काढावी, लागणारी कागदपत्र आणि काढण्याची शेवटची तारीख.

Farmer ID म्हणजेच ( शेतकरी ओळख क्रमांक )

शेतकरी ओळख क्रमांक बनवण्यासाठी http://pmkisan.maharastra.gov.in या वेबसाईटवर शेतकरी नोंदणी करताना तो तयार होतो. तलाठी कार्यालय किंवा सेवा केंद्र ( csc ) वर जाऊन काढता येतो. आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी सुधा हे काम केले जाते.
शेतकरी ओळख क्रमांक काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
1) आधार कार्ड
2) 7/12 उतारा ( शेतजमि‍नीचा दाखला )
3) बँक पास बुक ( शेतकर्‍याच्या नावावरील )
4) पास पोर्ट साईज फोटो
5) मोबाईल नंबर

PM KISAN YOJANA साठीFarmer ID काढायची शेवटची तारीख : प्रधान मंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत सहभागी कोणतीही शेवटची तारीख नाही अर्ज प्रक्रिया सतत चालू असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top