संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक म्हणजे महाकुंभ मेळा Prayagraj Mahakumbh Mela 2025 हा मेळा हिंदू पोराणिक गोष्टी आणि परंपरा मध्ये खोलवर रुजलेला आहे. महाकुंभ मेळा 144 वर्षा नंतर येतो.
Kumbh Mela भारतातील चार पवित्र ठिकाणी 12 वर्षाच्या चक्रा मध्ये चार वेळा साजरा केला जातो. हरिद्वार, प्रयागराज ( अलाहाबाद ), नाशिक, आणि उज्जेन अशा चार ठिकाणी जिथे गंगा, यमुना, सरस्वती आणि शिप्रा नद्यांचे धार्मिक महत्व आहे असे मानले जाते.Prayagraj Mahakumbh Mela 2025
Prayagraj Mahakumbh Mela 2025

Prayagraj Mahakumbh Mela 2025 भारतातील उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळा 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 रोजी संपणार आहे. हा कुंभ मेळा खूप महत्त्वाचा आहे 144 वर्षानंतर हा कुंभ मेळा साजरा केला जातो.याच्या अगोदर सन 1881 वर्षामध्ये हा महाकुंभ मेळा आला होता आणि आता 2025 रोजी हा महा कुंभ मेला भरवला गेला आहे आपण सर्व खूप भाग्यवान आहोत या पर्वामध्ये आपल्याला जन्म मिळाला या महाकुंभ मेळ्यामध्ये 44 दिवसाच्या कालावधी मध्ये साधारणतः 40 कोटी हून अधिक लोक प्रयागराज मध्ये येतील असा अंदाज वर्तवला जात आहे.गंगा यमुना आणि लुप्त झालेली सरस्वती नद्यांच्या संगमावर म्हणजेच या ठिकाणाला त्रिवेणी संगम म्हणून देखील संबोधले जाते.या ठिकाणी विशिष्ट वेळेत भाविक मोठ्या प्रमाणात शाही स्नान करतात इथे स्नान केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मोक्ष मुक्ती कडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो.
महा कुंभ मेळ्या मध्ये स्नान करण्यासाठी विशिष्ट तारखा पुढील प्रमाणे
| पौष पौर्णिमा | 13 जानेवारी 2025 |
| मकर संक्रांती | 14 जानेवारी 2025 |
| मौनी अमावस्या | 29 जानेवारी 2025 |
| वसंत पंचमी | 3 फेब्रुवारी 2025 |
| माघी पौर्णिमा | 12 फेब्रुवारी 2025 |
| महा शिवरात्री | 26 फेब्रुवारी 2025 |
Prayagraj Mahakumbh Mela 2025 साजरा करण्यात येणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी उत्तरप्रदेशातील शासनातर्फे खास बंदोबस्त करण्यात आला आहे. इथे येणाऱ्या नागा साधू आणि विविध समुदयासाठी प्रशासनाने 4,000 हेक्टरवर पूर्ण तंबुची व्यवस्था केली आहे.ज्यामध्ये 1,50,000 अधिक तंबू आणि स्वच्छता गृह उभारण्यात आले आहे. सुरक्षा chya दृष्टीने सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ए आय चलित देखरेखी खाली एकूण 40,000 पोलीस कर्मचारी इथे तैनात करण्यात आले आहेत.
Maha Kumbh Mela/ महा कुंभ मेळ्याचा इतिहास.
Prayagraj Mahakumbh Mela 2025 कुंभ मेळा हा हिंदू धर्म ग्रंथामध्ये मुख्यतः पुराण कथांमध्ये उल्लेख केलेल्या ” समुद्र मंथन ” या घटनेशी संबंधित जोडला गेलेला आहे. समुद्र मंथन दरम्यान देवांनी आणि असुरानी अमृत शोधून काढले जेंव्हा अमृतासाठी देवामध्ये आणि राक्षसा मध्ये भयंकर असे युद्ध सुरू झाले. स्वर्गामधून गरुड देवाने अमृताचे भांडे ( कुंभ ) असुरांपासून वाचवण्यासाठी दूर घेऊन गेले. त्यादरम्यान अमृताचे काही थेंब चार पवित्र ठिकाणी पडले. हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन या स्थानांना अमृत्वाची पवित्रता मिळाली. कुंभ मेळ्याची सुरुवात वैदिक काळापासून झाली जेंव्हा धार्मिक रित्या नद्यांची पूजा केली जायची.

महा कुंभमेळ्याचे प्रकार
- पूर्ण कुंभ मेळा :- दर 12 वर्षांनी चार ही ठिकाणी आयोजित केला जातो.
- अर्ध कुंभ मेळा :- हरिद्वार आणि प्रयागराज मध्ये दर सहा वर्षांनी आयोजित केला जातो.
- महाकुंभ मेळा :- प्रयागराज मध्ये दर 144 वर्षांनी आयोजित केला जातो.
- माघ मेळा :- प्रयागराज मध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा एक कार्यक्रम कुंभ मेळ्याचा छोटासा प्रकार मानला जातो.
मुघल काळामध्ये कुंभ मेळा काही अडचणींसह चालू राहिला. सम्राट अकबर बादशाहने प्रयागराज मध्ये कुंभ मेळ्याला पाठींबा दर्शिवला असे म्हटले जाते. ज्यामुळे कुंभ मेळ्याचे सांस्कृतिक महत्व दिसून आले.ब्रिटीश राजवटीमध्ये कुंभमेळा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक म्हणून प्रशिद्ध झाला होता. 2025 चा कुंभ मेळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. ज्यामध्ये तपस्वी साधू, नागा साधू , यात्रेकरू यांसह पर्यटक आणि करोडो भाविक प्रयागराज इथे येत आहेत. करोडो लोक इथे त्यांचे पाप शुध्द करण्यासाठी आणि अध्यात्मिक आशीर्वाद मिळवण्यासाठी, आत्मा निर्मळ करण्यासाठी पवित्र त्रिवेणी संगम असलेल्या ठिकाणी पवित्र स्नान करतात. प्रमुख कार्यक्रमामध्ये विविध तपस्वी, अघोरी नागा साधू या मंडळींचे शाही स्नान आणि अध्यात्मिक प्रवचन याचा समावेश आहे.
Table of Contents
visit our website : angadgawale.in
कुंभ मेळ्यातील नागा साधूंचे महत्व

Prayagraj Mahakumbh Mela 2025 नागा साधू हा तपस्वी लोकांचा एक वेगळा गट आहे. जो कुंभ मेळ्यामध्ये प्रमुख पणे सहभागी होतो. नागा साधू कुंभ मेळ्यामध्ये विशेषतः शाही स्नान सारख्या कार्यक्रमामध्ये पवित्र मिरवणुकीचे नेतृत्व करतात यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका असते. नागा साधूंचा अवतार म्हणजे त्यांच्या पूर्ण शरीरावर राख लावलेली असते भयानक केस भूषा आणि भगवे पोशाख हे त्यांचे स्वरूप खूप आकर्षक आहे.त्यांचा या अवस्थेमुळे अनेकदा लोकांमध्ये भीती, कौतुक आणि आदराच्या भावना निर्माण होतात. या अघोरी नागा साधुमध्ये बरेच साधू एकांत्तात राहतात जशे हिमालयीन गुहांमध्ये कुंभमेळ्यासारख्या धार्मिक उत्सवामध्ये ते समाजामध्ये समाविष्ट होतात. नागा साधूंमध्ये जास्त तर पुरुष लोक असतात पण त्यामध्ये काही प्रमाणात महिला तपस्वी सुधा असतात त्या प्रत्येक विधी मध्ये भाग घेतात त्यांना नागा साध्वी म्हणून ओळखले जाते. कुंभ मेळ्यामध्ये त्यांचे असणे अध्यात्म आणि भक्ती मार्गाचे खोलवर नाते दर्शिवते. नागा साधू लोकांना आशीर्वाद आणि अध्यात्मिक मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी आकर्षित करतात.
visit our website : Subhadra Yojana ( strong woman power )/महिलाओं के खाते मे 50,000 रु जमा किये जा रहे है.
महाकुंभ मेळा किती वर्षा नंतर येतो
महाकुंभ मेळा 144 वर्षाच्या नंतर येतो
महाकुंभ मेळ्याचे वैशिष्टे काय आहे
त्रिवेणी संगमावर शाही स्नान करून पाप मुक्त होणे
कुंभमेळा झाल्यानंतर नागा साधू कुठे जातात
कुंभमेळा संपल्यावर नागा साधू जंगलात आणि हिमालयात जाऊन तपस्या करतात.
कुंभमेळा किती ठिकाणी भरतो
कुंभमेळा चार ठिकाणी भरवला जातो. हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जेन

Pingback: GNM (General Nursing And Midwifery ) आणि ANM Course ( Auxiliary Nursing And Midwifery ) कोर्स विषयी माहिती 2025, Best Course. - %sitename