
ST महामंडळ भरती 2025

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या अंतर्गत येणारे ST महामंडळ भरती 2025 मध्ये 17000 हून जास्त पदांसाठी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडून या पद भरतीची घोषणा करण्यात आली आहे. 2 ऑक्टोबर 2025 पासून ई – निविदा या ठिकाणी भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार या भरती अंतर्गत एकूण 17 हजार 450 जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. http://msrtc वर या भरतीची सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे.
ST महामंडळ मध्ये नोकरीचा कालावधी
ST महामंडळ मध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनातर्फे निघालेल्या जाहिराती प्रमाणे ही भरती एसटी महामंडळामध्ये कंत्राटी स्वरूपात असणार आहे. या भरती चा कालावधी तीन वर्ष करार पद्धतीने असणार आहे. ST महामंडळ मध्ये 3 वर्षे काम करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्द करून दिलेली आहे.

चालक व वाहक या पदासाठी लागणारी पात्रता
शैक्षणिक पात्रता :
1) इयत्ता 10 वी पास ( एस एस सी उत्तीर्ण )
2) मराठी भाषेमध्ये लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.
3) प्रादेशिक परिवहन कार्यालय ( आर टी ओ ) यांच्या कडून सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना ( लायसन्स ) आणि पी. एस. व्ही बॅच ( बिल्ला ) असणे आवश्यक आहे.
4) प्रादेशिक परिवहन कार्यालय ( आर टी ओ ) यांच्या कडून वाहकाचा वैध परवाना ( लायसन्स ) आणि बॅच ( बिल्ला ) नियुक्ती पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
5) जामीन देण्याचे सामर्थ्य ( क्षमता ) असायला पाहिजे
वरील शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेद्वारांना या पदासाठी अर्ज करता येतो.
चालक व वाहक पदासाठी अनुभव
- ST महामंडळ मध्ये चालक या पदासाठी सगळ्या प्रकारची अवजड वाहने विशेष म्हणजे डिझेल वर चालणारी अवजड वाहने ( ट्रक,टेम्पो,प्रवासी बस ) यांसारखे वाहने चालवण्याचा किमान तीन वर्षाचा ( विना अपघात ) अनुभव असायला पाहिजे.
- अवजड वाहन परवाना ( लायसन्स ) मिळाल्या पासून पुढे तीन वर्षाचा अनुभव पात्र असणार आहे. त्या अगोदरचा परवाना असलेल्या उमेदवाराची दखल घेतली जाणार नाही.
- चालक या पदासाठी अनुभवाचा दाखला सरपंच/पोलिस पाटीलआणि वाहन मालक यांच्या स्वाक्षरी सह दिलेल्या संकेतस्थळावर जाहिराती सोबत दिलेल्या मोकळ्या जागी नमूद करणे आवश्यक आहे.
- सदर दाखला निवडपूर्व कागदपत्रांच्या तपासणी वेळी सादर करणे आवश्यक आहे.
- वाहक या पदासाठी 10 वी उत्तीर्ण आणि पी. एस. व्ही बॅच ( बिल्ला ) असणे आवश्यक आहे.
ST महामंडळ वाहक व चालक या पदासाठी शारीरिक पात्रता
ST महामंडळ भरती 2025 :
1) वाहक व चालक या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची ऊंची किमान 160 सें. मी व कमाल ऊंची 180 सें. मी असायला पाहिजे.
2) वाहक व चालक यांची दृष्टी डोळ्यावर चश्मा न घालता 6*6 असणे आवश्यक आहे.
3) रंग अंधलेपणा किंवा रात आंधळेपणा असणारे उमेदवार अपात्र असणार आहेत.
वरील प्रकारची शारीरिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. ABHA HEALTH CARD – आभा हेल्थ कार्ड काढा, मोबाईल मधून 2 मिनिटांत. (GOOD BENEFIT)
चालक व वाहक पदासाठी लेखी परीक्षा आणि अभ्यासक्रम
ST महामंडळ भरती 2025 :
चालक व वाहक या पदासाठी लेखी परीक्षेस 50 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण या प्रमाणे एकूण 100 गुणाची लेखी परीक्षा असणार आहे. या परीक्षेचा कालावधी 1 तास 30 मिनिटे असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असणार आहेत त्यातील अचूक एक पर्याय निवडायचा आहे.
| क्रमांक | पदाचे नाव | अभ्यासक्रम | विषय आणि गुण | परीक्षेचा कालावधी |
| 1 | वाहक व चालक | वाहन चालवण्याचे कौशल्याची स्वतंत्र वाहन चालवून चाचणी घेण्यात येणार, वाहतूक चिन्हे, नियम, सुरक्षित वाहतूक आणि वाहतूक नियम याबद्दल अभ्यासक्रम असणार आहे | 1) मराठी – 25 2) इंग्रजी – 25 3) सामान्य ज्ञान – 25 4) अंकगणित – 25 | 1 तास 30 मिनिटे |

चालक व वाहक पदासाठी वेतनश्रेणी
ST महामंडळ 2025 :
चालक व वाहक या पदासाठी निवड झाल्या नंतर 48 दिवसांचे नेमणूक पूर्व प्रशिक्षण असणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर चालक व वाहक या पदासाठी कनिष्ठ वेतन श्रेणीत तीन वर्षे करिता नेमणूक होणार आहे. तीन वर्षाच्याब कालावधी मध्ये मूळ वेतनसह नियमानुसार देण्यात येणारे भत्ते मिळणार आहेत.
या पदावरील वेतन श्रेणी पहिल्या तीन वर्षा करिता रु. 4500-4400/-अधिक नियमानुसार मिळणारे भत्ते,प्रती वर्षी 3 टक्के दराने वार्षिक वेतन वाढ व त्या नंतर नियमित वेतन रु.4700-15367/- अधिक नियमानुसार साधारण 30,000 रु पगार मिळणार आहे.