कारगिल युद्धात स्वतःची आहुती देणारा शेरशाह कॅप्टन विक्रम बत्रा (Lion Of Kargil) ( 9 सप्टेंबर 1974 – 7 जुलै 1999 ) Strong Leader

कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन विक्रम बत्रा भारतीय सैन्यातील एक बहादूर अधिकारी होते, त्यांनी 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात महत्व पूर्ण भूमिका निभावत पूर्ण देशासमोर आदर्श निर्माण केला. कॅप्टन विक्रम बत्रा 13 जम्मू आणि काश्मीर रायफल्स ( JAK RIF ) बटालियन चा हिस्सा होते आणि ऑपरेशन विजय च्या दरम्यान त्यांची महत्वाची भूमिका होती.

कारगिल योद्धा कॅप्टन विक्रम बत्रा यांचे बालपण

विक्रम बत्रा यांचा जन्म हिमाचल प्रदेश मध्ये पालमपूर येथे दिनांक 9 सप्टेंबर 1974 साली झाला. विक्रम बत्रा लहानपणी पासून शिक्षणा मध्ये तसेच खेळामध्ये अग्रेसर होते.त्यांनी त्यांच शिक्षण डी. ए. वी कॉलेज चंदिगढ येथून पूर्ण केले. त्यांची भारतीय सैन्याबद्दल आणि देशाबद्दलचे प्रेम एवढे जास्त होते कि त्यांनी भारतीय लष्करामध्ये भरती व्हायचे ठरवले.त्यांनी भारतीय सैन्य अकादमी देहरादून (IMA) येथून ट्रेनिंग घेतली आणि सन 1997 रोजी भारतीय सैन्यामध्ये दाखील झाले.

कारगिल योद्धा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या वैयक्तिक जीवन

विक्रम बत्रा पंजाब युनिवर्सिटी चंदिगढ येथे एम.ए मध्ये शिकत असताना त्यांच्या सोबत शिकत असलेल्या डिम्पल चिमा नावाची मुलगी त्यांच्या सोबत शिकत होती. विक्रम हे शिक्षणा मध्ये हुशार असल्यामुळे डिम्पल सोबत लवकरच त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झाले. विक्रम बत्रा यांच्या मनामध्ये पहिल्यापासून भारतीय सैन्यामध्ये जायची इच्छा होती. आणि जेंव्हा त्यांची निवड भारतीय सैन्य अकादमी देहरादून मध्ये झाली तेंव्हा त्यांनी शिक्षण सोडून आपले भारतीय सैन्यात सामील व्हायच्या स्वप्नाकडे जायचे ठरवले. डिम्पल ने सुधा त्यांच्या या निर्णयाला समर्थन दिले आणि त्यांची वाट पाहण्याचे ठरवले.


विक्रम आणि डिम्पल यांचे लग्न करण्याविषयी सुधा बोलणे झाले होते. असंच एक वेळेस डिम्पलने मजाक मस्ती मध्ये विक्रम ला बोलली कि तू खरच माझ्याबरोबर लग्न करणार असशील तर “माझ्या डोक्यावर सिंदूर भरून दाखव” विक्रम ने सुधा क्षणाचाही विलंब न करता आपल्या बोटांनी तिच्या भांगात सिंदूर भरून सांगितले कि “आता तरी टू माझी झालीस” हि घटना त्यांच्या नात्यातील आपुलकी दाखवतो.

कारगिल युद्धाच्या वेळी कॅप्टन विक्रम बत्रा यांनी डिम्पल ला शपत दिली होती कि जेंव्हा मी वापस येईल तेंव्हा आपण लग्न करू पण दुर्देवाने 7 जुलै 1999 त्यांना वीरमरण प्राप्त झाले. डिम्पल ने विक्रम च्या मरणानंतर आजीवन विवाह न करण्याचे ठरवले आणि आज पर्यंत त्या अविवाहित आहेत. त्यांच आज यावर असं म्हणन आहे कि ” मी हमेशा त्यांची पत्नी होते,आहे, आणि शेवटपर्यंत त्यांचीच पत्नी राहणार”
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवन चरित्रावर 2021 मध्ये “शेरशाह” ( http://shershah movie)नावाची फिल्म आली होती ज्यामध्ये यांच्या प्रेमाची कहाणी जिवंत केली होती. कॅप्टन विक्रम बत्रा यांचे बलिदान आणि डिम्पल चिमा यांचा त्याग खर्या प्रेमाचे प्रतिक म्हणून आज पण लोकांच्या मनात जिवंत आहे.

कॅप्टन विक्रम बत्रा यांचे भारतीय सैन्यातील करिअर

कॅप्टन विक्रम बत्रा यांना 13 जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कमिशन मिळाले. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान त्यांनी पोइन्ट 5140 आणि प्वाइंट 4875 सारख्या महत्वाच्या टेकड्यांवर कब्जा करून महत्वपूर्ण भूमिका निभावली. त्याच्या या बहादुरी मुळे त्यांना शेरशाह हे नाव देण्यात आले.
त्यांचा प्रशिद्ध युद्धघोष “ये दिल मांगे मोर” असा होता.या वाक्याने बाकी सैनिकांची हिम्मत वाढत असत , 7 जुलै 1999 ला त्यांच्या सोबतच्या सैनिकाला गोळी लागली असता त्याची मदत करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या यातच त्यांचा मृत्यू झाला आणि ते शहीद झाले.

कॅप्टन विक्रम बत्रा यांचे शब्द जे त्यांची देशभक्ती दर्शवतात.

  • या तो मै तिरंगा लहराकर जाऊंगा, या फिर तिरंगे में लीपटकर जाऊंगा, लेकीन मै आऊंगा जरूर.( हे वाक्य त्यांच्यातील साहस आणि देशावरील असलेले प्रेम दर्शवते )
  • ये दिल मांगे मोर ( हे त्यांचे युद्धाच्या वेळेचे रेडीओ संदेश होता ज्यामध्ये त्यांची अतूट इच्छाशक्ती आणि जोश पाहायला मिळतो.)
  • जो भी लक्ष्य तय किया है, उसे हर हाल में हासील करणा है. (त्यांच्या या विचारातून त्यांची दृढ निश्चय आणि वीरता पाहायला मिळते)
    GNM (General Nursing And Midwifery ) आणि ANM Course ( Auxiliary Nursing And Midwifery ) कोर्स विषयी माहिती 2025, Best Course.
संपूर्ण नाव कॅप्टन विक्रम बत्रा
उपनाव शेरशाह
जन्म 9 सप्टेंबर 1974
जन्म स्थान घुग्गर, पालमपूर,हिमाचल प्रदेश
वडील जी.एल.बत्रा ( स्कूल प्रिन्सिपल )
आई कमल कांत बत्रा ( स्कूल टीचर )
भाऊ-बहिण विशाल बत्रा (जुडवा भाऊ) दोन बहिणी
प्रेमिकाचे नाव डिम्पल चिमा ( स्कूल टीचर )
शिक्षण डी.ए.वी.कॉलेज, चंदिगढ नंतर भारतीय सैन्य अकादमी देहरादून
रेजिमेंट 13 जम्मू आणि काश्मीर रायफल्स
रेंक कॅप्टन
वीरता पुरस्कार परमवीर चक्र ( शहीद झाल्या नंतर )
शहीद 7 जुलै 1999 कारगिल युद्ध,जम्मू काश्मीर.

visit : http://www.angadgawale.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top